adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्लीच्या तापीमाई कॉलनीत आदिवासी दिन उत्साहात साजरा

 अंतुर्लीच्या तापीमाई कॉलनीत आदिवासी दिन उत्साहात साजरा  अंतुर्ली – किरण धायले : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथ...

 अंतुर्लीच्या तापीमाई कॉलनीत आदिवासी दिन उत्साहात साजरा 


अंतुर्ली – किरण धायले :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथील तापीमाई कॉलनी परिसरात कोरकू, पावरा, कोळी व भिल्ल समाजबांधवांच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला गावातील नागरिक, समाजबांधव, महिला व बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, तंट्यामामा, रंगा कोरकू, भगवान वीर एकलव्य व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सौ. चंदाबाई रामदास जांभेकर यांच्या शुभहस्ते प्रतिमांचे पूजन करून महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, विविध समाजातील बांधव-भगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी दिनाचे औचित्य साधून सर्व समाजबांधवांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दरम्यान, सायंकाळी नावाजलेल्या रॉक स्टार बँडच्या साथीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास संदीप तोटे, आदिवासी राष्ट्रीय अध्यक्ष जयेश, दाजी बेठेकर (राष्ट्रीय संयोजक, धारणी), राजू पाटील (आदिवासी मध्य प्रदेश संयोजक), ज्येष्ठ नागरिक एस. ए. भोईसर, गणेश तराळ, सुनील पाटील, विलास पांडे, मोहन बेलदार, मोहन महाजन, पोलीस पाटील किशोर मेढे, नरेंद्र दुत्ते, अनिल वाडीले, किरण धायले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशिलाबाई जांभेकर, सुशिलाबाई पाटील, गीताबाई जांभेकर, राजू भिल्ल, महेंद्र जाधव, सुनील बारेला, विश्राम बारेला, राहुल महाजन, पंकज महाजन, महेश महाजन, धीरज कोळी, प्रफुल्ल मेढे, सुरेश जीरी, रमेश कोळी, अतुल ठोसरे तसेच सर्व समाजबांधव व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.

आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments