जळगाव जिल्ह्यात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य अग्रस्थानी; दरवर्षी शेकडो मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान त्याग, सेवा आणि समाजप्रबोधनातून गुरुदे...
जळगाव जिल्ह्यात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य अग्रस्थानी; दरवर्षी शेकडो मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान
त्याग, सेवा आणि समाजप्रबोधनातून गुरुदेवांच्या विचारांची चेतना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- जळगाव जिल्ह्यात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य आज अग्रस्थानी असून दरवर्षी किमान शंभर पुरस्कार देऊन समाजातील तळागाळातील मान्यवरांना या वेळी सन्मानित करण्यात येते , कुठल्याही संस्थेचे एवढे कार्य नाही परंतु गुरुदेव सेवा मंडळ या कार्यासाठी अहोरात्र धडपडत असते अशी माहिती गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा स्तरीय प्रचारक हरिश्चंद्र माधव बाविस्कर यांनी दिली. पायाला भिंगरी बांधून आपण गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात स्वतःला झोकून देतो, त्याग व सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना गुरुदेवांच्या कार्यापासून चेतना मिळावी म्हणून आपण काही मोजक्या शिलेदारांना हाताशी घेऊन गुरुदेवाचे कार्य तडीस नेण्याचा प्रयत्न करत असतो असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. चोपडा येथे विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांचे डोळे नाक कान याविषयीच्या शिबिरात आपण सक्रिय सहभाग नोंदवत असतो. दरवर्षी किमान सव्वाशे ते दीडशे पुरस्कार गुरुदेव सेवा मंडळ वितरित करीत असते. यासाठी मला अनेकांचे सहकार्य लाभते. त्यात मुंबई येथून आमदार रमेश दादा पाटील, भाऊसाहेब केदु देसले, चोपडे शहरातील दिनेश दंडवते, कवी व साहित्यिक रमेश जे. पाटील, सुभाष कोळी कोळंबा सोशल मीडिया व प्रिंट मीडिया यांनी देखील माझ्या कार्याला निस्वार्थपणे सहकार्य केले आहे या सर्वांचा मी ऋणी आहे असे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना सांगितले. श्रीमती आशाताई बाविस्कर, जगन्नाथ बापू बाविस्कर यावेळी हजर होते.

No comments