फैजपूरचे नगरसेवक शेख युनूस शेख अय्यूब यांची एमआयएमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड पक्ष संघटना मजबूत करण्यासह जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्या...
फैजपूरचे नगरसेवक शेख युनूस शेख अय्यूब यांची एमआयएमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
पक्ष संघटना मजबूत करण्यासह जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची जबाबदारी; निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक शेख युनूस शेख अय्यूब यांची एमआयएम पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेख युनूस शेख अय्यूब यांच्या निवडीमुळे फैजपूरसह परिसरातील एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला जिल्ह्यात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देत त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “जनतेच्या हक्कांसाठी, त्यांच्या मूलभूत गरजांसाठी तसेच शहर व परिसरातील विकासाच्या प्रश्नांसाठी यापुढेही सातत्याने आवाज उठवत राहणार आहे. पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक शेख युनूस शेख अय्यूब यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल फैजपूर शहर व परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments