शां.ज.पाटणी विद्यालयास सर्वतोपरी मदत करू - आमदार सत्यजित तांबे दिपक कदम / श्रीरामपूर : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शां.ज.पाटणी विद्यालया...
शां.ज.पाटणी विद्यालयास सर्वतोपरी मदत करू - आमदार सत्यजित तांबे
दिपक कदम / श्रीरामपूर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शां.ज.पाटणी विद्यालयाच्या भौतिक सुविधांच्या विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांनी दिले. शां.ज.पाटणी विद्यालयास सदिच्छा भेट प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी विद्यालयाच्या गुणवत्ता सुधार प्रकल्पावर चर्चा करून मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार व स्वागत केले.
यावेळी प्रा.गणेश गुंजाळ, प्रा. निलेश तांबे, शंकर शिंदे, गोपाल जोशी, योगेश आसने, दीपक कदम, संस्थेचे सहाय्यक सचिव योगेश देशमुख,
स्कूल कमिटी सदस्य किशोर फुणगे, पतपेढीचे संचालक महेश डावरे, उर्मिला पुजारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा कांबळे, पर्यवेक्षक कैलास जेजूरकर, सुरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कळमकर यांनी केले, तर कैलास जेजूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षक , शिक्षिका तथा कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
--------------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments