adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खादी ग्रामोद्यक संचालकपदी विनित भरतशेठ कुंकुलोळ !

 खादी ग्रामोद्यक संचालकपदी विनित भरतशेठ कुंकुलोळ !  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रीरामपूर तालुका विविध कार्यकारी स...

 खादी ग्रामोद्यक संचालकपदी विनित भरतशेठ कुंकुलोळ ! 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपूर तालुका विविध कार्यकारी सहकारी खादी ग्रामोद्योग संघाच्या स्विकृत सदस्य पदावर संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा समाजसेवक स्व. भरतशेठ कुंकूलोळ यांचे सुपुत्र विनित भरतशेठ कुंकूलोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या मासिक बैठकीत चेअरमन सुरेश चौधरी यांनी सुचना मांडली, माजी चेअरमन, ज्येष्ठ सदस्य अनिल जाधव यांनी अनुमोदन दिले, यावेळी सर्व संचालक मंडळाच्यावतीने ठराव मंजूर करण्यात आला.

विनित भरतशेठ कुंकूलोळ यांच्या श्रीरामपूर तालुका विविध कार्यकारी सहकारी खादी ग्रामोद्योग संघाच्या स्विकृत सदस्यपदी निवडीबद्दल आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, माजी आ.भानुदास मुरकुटे, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, भैरवनाथ ग्रामपंचायत सरपंच सौ.दिपाली फरगडे, दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच सौ. सारिका कुंकूलोळ, नगरसेविका सौ.प्रणिती चव्हाण, इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे सचिव प्रा. सुनिल साळवे (सर), सतीश कुंकूलोळ , कल्याण कुंकूलोळ आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन त्यांच्या भावी उज्ज्वल कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. 

संस्थेचे वतीने नुतन संचालक विनित कुंकुलोळ यांचा सत्कार करण्यात आला,याप्रसंगी बोलताना श्री. कुंकूलोळ म्हणाले की, आगामी काळात खादी ग्रामोद्योग संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहुन आपले वडील स्व. भरतशेठ कुंकुलोळ यांनी त्यांच्या जीवनात केलेला समाजकार्याचा वारसा आपण तसाच पुढे अविरतपणे चालवत आपणही  समजकार्य, मदत कार्य सातत्याने करत राहणार असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेश चौधरी, व्हा.चेअरमन दीपक चव्हाण, नगरसेवक रवि पाटील, सर्वश्री संचालक प्रविण फरगडे, प्रेमचंद कुंकूलोळ,अनिल जाधव, सागर भागवत,दिनेश तरटे, सुधीर वायखिंडे, संचालिका सौ.फरगडे प्रमोद, श्रीमती फासाटे, सचिव संजय चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

----------------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments