संजय साळवे यांना कर्तुत्व गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान ! श्रीरामपूर प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिव्यांग क्षेत्रात अत...
संजय साळवे यांना कर्तुत्व गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान !
श्रीरामपूर प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिव्यांग क्षेत्रात अतुलनीय लक्षवेधी सामाजिक कार्य, तृतीयपंथीय,शरीर विक्रेय करणाऱ्या महिला, लोककलावंत,नाट्य क्षेत्र सांस्कृतिक व क्रीडा विभाग अष्टपैलू क्षेत्रात केलेल्या अनमोल सामाजिक कार्याबद्दल अष्टपैलू व्यक्तीमत्व संजय साळवे,सौ.वर्षा साळवे व कन्या कु. सहर्षा साळवे यांना कर्तुत्व गौरव पुरस्कार निवासी जिल्हाधिकारी मा. दादासाहेब गिते यांच्या शुभहस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी एन.ए.पी. एस. डब्ल्यू.आय.दिल्ली चे अध्यक्ष मा.संजय भट, जिल्हा न्यायधीश मा.शिंदे साहेब,माजी उपायुक्त तथा माजी विद्यार्थी संघटना सचिव मा. सी.व्ही. नांदेडकर सी.एस.आर.डी.संस्थेचे संचालक डॉ.सुरेश पठारे, साहित्यिक डॉ.निलीमा बंडेलू यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजकार्य महोत्सव - २०२६ कार्यक्रमात संजय साळवे यांनी सामाजिक परिवर्तनसाठी केलेल्या कार्या ची चित्रफीत दाखविण्यात आली. सध्या ते श्रीरामपूर येथील दिव्यांग सक्षमीकरण विभाग अंतर्गत मुकबधिर विद्यालयांमध्ये दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
याबरोबर अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन आणि आसान दिव्यांग संघटनेचे संस्थापक तसेच दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा व्यवस्थापन समितीचे अशासकीय सदस्य आदी पदांचा ते पदभार सांभाळात आहेत.
दिव्यांग क्षेत्रात आजतागायत त्यांच्याकरवी नवनवीन उपक्रम राबवून दिव्यांगाना न्याय मिळवून देण्यात आला आहे. दरवर्षी मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांसाठी वधु - वर परिचय मेळावा आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते, आज तागायत २८६ जोडप्याचे विवाह जमविण्यात त्यांना यश आले आहे.
*लक्षवेधी कार्य* तृतीयपंथीय,शरीर विक्रय करणाऱ्या महिलांसाठी विशेष कार्य,एड्स जनजागृती मोहीम, शब्दफुले एड्स विशेषांक संपादित करून समाज प्रबोधन,दिव्यांग शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाचवा, सहावा,सातवा वेतन आयोग, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण प्रणाली अस्तित्वात यावी यासाठी केलेला प्रयत्न, दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन, हरिगांव येथे विविध सामाजिक उपक्रम, वेडसर, मनोरुग्ण यांच्या साठी विशेष ध्यानधारणा कार्यक्रम,अस्थिव्यंग आणि मतिमंद प्रवर्गातील दिव्यांगांसाठी परिस्पर्श प्रकल्पाची निर्मिती असे हृदयस्पर्शी उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचा सदरील कार्यक्रम माऊली सभागृह,अहिल्यानगर याठिकाणी प्रचंड प्रेक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी इंडियन आयडल फेम गायक अभिषेक नलावडे, सारेगमप फेम गायिका ब्रह्मानंद पाटणकर यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम पार पडला.
संजय साळवे यांचे माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग देविदास कोकाटे, प्रा.प्रकाश पाटील,प्रा. ललिता लोळगे,विक्रीकर अधिकारी हसे साहेब, अहिल्यानगर कॉलेजचे प्रा.शाम खरात,आरोग्य विभाग सौ.ज्योती हासे, जिम प्रशिक्षक अनिल साळवे, कुस्तीपटू रवींद्र लहामगे, जागरण गोंधळ संघटनेचे वैजीनाथ घोडके, जानकीबाई आपटे, मूकबधिर विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ते जगदीश मिसाळ, सौ.अर्चना देशमुख मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले. संजय साळवे यांनी आपल्या समाजकार्यातून समाजापुढे आदर्श उभा केला आहे.त्यांच्या अष्टपैलू समाजकार्याने आपली ओळख निर्माण करणे याचा परिपाठ आहे हे युवकांसाठी एक पाऊलवाट ठरावी असेच आहे.
-----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments