adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा पोलीसांनी केला दुचाकी चोरीचा पर्दाफाश ! मोटारसायकल केली हस्तगत.

 निंभोरा पोलीसांनी केला दुचाकी चोरीचा पर्दाफाश !  मोटारसायकल केली हस्तगत.   मुबारक तडवी रावेर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  खिर्डी बु.तालुक...

 निंभोरा पोलीसांनी केला दुचाकी चोरीचा पर्दाफाश !  मोटारसायकल केली हस्तगत. 


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 खिर्डी बु.तालुका रावेर येथील हॉटेल व्यावसायिक प्रविण जैस्वाल यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती या दुचाकी चोरीचा उलगडा करण्यात निभोरा पोलिसांना यश आले आहे. निंभोरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपीस चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे व आरोपींकडून २९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घरासमोर चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न (एमएच १९ ईएक्स २६८९) ही ७० हजार रुपये किंमतीची दुचाकीही हस्तगत केली आहे. या प्रकरणी किरण उर्फ गफूर पितांबर कोळी रा. खिर्डी बुद्रुक, ता. रावेर यास ताब्यात घेतले असून गुन्ह्याची कबुली दिली आहे  ही कारवाई निंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल रिजवान पिंजारी, किरण चाटे, सुभाष शिंदे आणि सर्फराज तडवी यांच्या पथकाने सुक्ष्म तपास करुन आरोपीला ताब्यात घेत दुचाकी हस्तगत केली.आरोपीला रावेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

No comments