adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाळवंटातील शांतीचा झरा- हजरत मोहम्मद पैगंबर (स.)

  वाळवंटातील शांतीचा  झरा- हजरत मोहम्मद पैगंबर (स.)  [अब्दुल सरदार पटेल]  चोपडा  या जगावर प्रभाव टाकणाच्या सर्वश्रेष्ठ शंभर महापुरुषांची याद...

 वाळवंटातील शांतीचा  झरा- हजरत मोहम्मद पैगंबर (स.) 

[अब्दुल सरदार पटेल]

 चोपडा

 या जगावर प्रभाव टाकणाच्या सर्वश्रेष्ठ शंभर महापुरुषांची यादी एका युरोपियन विद्वानाने प्रसिद्ध केली त्यात मुहमद पैगंबर प्रथम क्रमांकावर आहेत. मानवी जीवनाचा प्रवाहच बदलून टाकणाऱ्या मुहमद पैगंबरांचा जन्म इ.स. ५७० मध्ये कुरेश नावाच्या जमातीत अरब स्थानात मक्का या शहरात झाला. थोर मुस्लिम पंडीत अबुल हसन अली नदवी म्हणतात.अल्लाह ची हि इच्छा होती की सर्व जगाला प्रकाशमान करण्यासाठी     मानवतेच्या मार्गदर्शनाचा तेजस्वी सूर्य अरब भूमीतच उदयास यावा.

पूर्वीचा समाज, अंधश्रद्धत कर्मकांडात व्यसनात जुगारात दैववादात, माणसाला गुलाम करण्यात, बालहत्या करण्यात उपभोग घेण्यात मग्न झाला होता . मार्गभ्रष्ट झालेला होता. अंधकारात जगणाऱ्या या अरबांना प्रेशितांनी दैवी संदेशाच्या द्वारे नव प्रकाश दिला नवे ज्ञान दिले नवी संस्कृती दिली नवजीवन दिले या विश्वाचा निर्माता एकच आहे तो अल्लाह आहे या एकेश्वरवादावर श्रद्धा ठेवणे हे इस्लामचे पहिले मूलभूत तत्व होते अल्लाहने मुहम्मदाना आपला प्रेषित म्हणून पाठवले आहे यावर श्रद्धा ठेवणे दुसरे मूलभूत तत्व तर कुराण वर श्रद्धा ठेवणे तिसरे मूलभूत तत्व होते.

दिवसातून ५वेळा नमाज आपल्या उत्पननातून अडीच टक्के जकातची रक्कम गरीब व गरजूंना वाटावी रमजान महिन्यात रोजा (उपवास) द्वारे वाईट गोष्टी पासून दूर रहावे व आयुष्यात एकदा हज करावे व एकमात्र अल्लाहवर श्रद्धा ही पंचसूत्री हजरत मुहम्मद पैगंबरांनी समाजापुढे ठेवली.

मोहम्मद पैगंबरांचे आयुष्य कुराणात अल्लाहने दिलेल्या आदेशानुसार होते कुराणातील आदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरविले होते ते फारच विनम्र, मनमिळाऊ, मेहरबान व दयाळू होते ते सर्वावर प्रेम करीत ते अत्यंत उदार व दानशूर होते ते शक्यतो सर्वांच्या इच्छा पूर्ण करीत स्वतः उपाशी राहत पण व दुसऱ्यांना जेवायला घालीत ते अनाथांवर प्रेम करीत त्यांच्याशी सलोख्याची वागणूक ठेवण्या बाबत ते सर्वांना सांगत "ज्या घरात अनाथाला चांगली वागणूक दिली जात आहे ते मुसलमानांचे सर्वात चांगले घर आहे असे ते सांगत.


मोहमद पैगंबर (स.) दररोज नमाजसाठी मशिदित जा यचे रस्त्यात एक यहूदी महिलेचे घर लागायचे ती महिला दररोज त्यांच्या अंगावर कचरा फेकत असे. दोन दिवस झाले तिन दिवस झाले पण त्या महिलेने त्यांच्या अंगावर कचरा टाकला नाही काय झाले म्हणून हुजूर त्यांच्या घरी गेले तर ती महिला आजारी होती. त्यांनी त्या महिलेची विचारपुस केली व औषधोपचार तसेच विश्रांती घेण्याचे सांगितले कचरा अंगावर टाकणाऱ्या महिलेच्या विचारात परिवर्तन झाले

तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या व आज पासुन मी तुमच्या सोबत असून तुम्ही दाखविलेल्या सत्याच्या मार्गावरच चालणार असे तिने सांगितले.

   ईस्लामच्या आधी स्त्रियांना तुच्छतेने वागविले जात अरबस्तानात कन्येला जन्मताच जिवंत दफन करण्याची पद्धत होती पैगंबरांनी आपल्या मधुर वाणीने उपदेश करून मुलींना जिवंत दफन करायाची कुप्रथा बंद केली. स्वतः च्या मुलीचा खून करनाऱ्यास माफ केले. ते शिक्षा करू शकत होते. पण त्यांनी त्याची मृत्युदंडाची शिक्षा माफ केली

मुहम्मद पैगंबरांची शिकवण होती, आई वडिलांची सेवा करा, वस्तूंमध्ये भेसळ करू नका , मोजमाप करण्यात कमी देऊ नका, दुसऱ्यांची संपत्ती बेकायदेशीर रित्या हडप करू नका,प्राणीमात्रांवर दया करा प्राण्या कडून त्यांच्या शक्तीपेक्षा जास्त काम करून घेऊ नका. कुणाला पैशांची गरज असेल तर द्या पण व्याज घेऊ नका दारू पिऊ नका कोणतेही व्यसन वाईट आहे नशा करू नका त्यांची राहणी फारच साधी होती जे ताटात येई ते खात जे जाडे भरडे कपडे मिळत ते घालीत. जमिनीवर चटईवर जेथे जागा मिळे तिथे बसत मृत्युसमयी आपल्या जवळील सर्व पैसा गोर गरीबांना दान केला. हिजरी सन रबी-अल-अव्वल ११ मे इ.स.६३२ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. चौदाशे वर्षे झाली तरी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर ईस्लामची पताका जगातील सर्व देशात फडकत आहे

संकलन 

[ अब्दुल सरदार पटेल]

 चोपडा

No comments