निमगव्हान जि.प.उच्च प्राथमिक शाळेत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा अविनाश बाविस्कर निमगव्हाण (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज जिल्हा परिषद ...
निमगव्हान जि.प.उच्च प्राथमिक शाळेत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
अविनाश बाविस्कर निमगव्हाण
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा निमगव्हान येथे रक्षाबंधन,एक पवित्र बंधन हा सण सामूहिक रित्या साजरा करण्यात आला,ह्याप्रसंगी सर्व विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधली, त्याबद्द्ल मुलांनी विविध भेटवस्तू दिल्या,ह्याप्रसंगी आदरणीय दिनेश दादा सपकाळे,दीपक दादा दादा सौंदाणे,खुशालसिंग किराले,अविनाश दादा बाविस्कर,मुख्याध्यापक,श्रीमती रेखा मिठाराम पाटील मॅडम व प्रियांका मॅडम तसेच माजी विद्यार्थी समूह हजर होते, शिक्षणाबरोबरच संस्कार देणारी शाळा म्हणून निमगव्हाण शाळेचा नावलौकिक आहे, मुख्याध्यापक,शिक्षक,माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सर्व मिळून शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत

No comments