adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वच्छ शाळा – सुंदर शाळा : एक दिवस स्वच्छतेसाठी जि. प. केंद्र शाळा अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान

  स्वच्छ शाळा – सुंदर शाळा : एक दिवस स्वच्छतेसाठी जि. प. केंद्र शाळा अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान   किरण धायले...

  स्वच्छ शाळा – सुंदर शाळा : एक दिवस स्वच्छतेसाठी

जि. प. केंद्र शाळा अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान  


किरण धायले अंतुर्ली :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

“स्वच्छ शाळा – सुंदर शाळा, एक दिवस स्वच्छतेसाठी” या उपक्रमांतर्गत आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी जि. प. केंद्र शाळा, अंतुर्ली येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच श्री. गणेश तराळ, ग्रामपंचायत सदस्य श्री. मोहन बेलदार, ग्रामसेवक महेंद्र दुट्टे आप्पा, पोलीस पाटील, किशोर मेढे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती रूपाली पाटील मॅडम, उपाध्यक्ष श्री. शेषराव कोसोदे, समितीचे सदस्य, कलीम खाटीक अंगणवाडी सेविका व मदतनीस, माजी विद्यार्थी, शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील आदरणीय एस ए भोईसर श्री एस एम पगारे साहेब भैय्या शेख करीम यांनीही या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे स्वच्छता अभियानाला विशेष प्रोत्साहन मिळाले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रेमलता कोसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी माजी विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी एकत्रितपणे शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. शाळेचे मैदान, वर्गखोल्यांच्या परिसरातील कचरा, परिसरातील अनावश्यक गवत व इतर कचरा हटवून शालेय परिसर स्वच्छ, सुंदर व नीटनेटका करण्यात आला. या उपक्रमातून शाळा आणि ग्रामस्थ यांच्यातील सहकार्य व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. “स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे” हा संदेश या अभियानातून देण्यात आला. स्वच्छता अभियानासाठी उपस्थित राहून शाळेला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे श्री चंद्रकांत पाटील सर यांनी आभार मानले.

No comments