भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने चोपडा तहसील कार्यालयावर मोर्चा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : शेतकरी, शेतमजूर व अस...
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने चोपडा तहसील कार्यालयावर मोर्चा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : शेतकरी, शेतमजूर व असंघटित कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) वतीने आज चोपडा तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर व असंघटित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे फलक व पक्षाचे लाल झेंडे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना प्रभावीपणे राबवावी, रेशन व्यवस्था मजबूत करावी, गायरान अतिक्रमित जमिनींचे सातबारा उतारे संबंधितांच्या नावे करावेत, गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ज्ञानेश्वर पाटील, तालुका सचिव कॉ. बाळू लोहार, कॉ. वासुदेव कोळी, कॉ. नानाभाऊ पाटील, कॉ. गोरख वानखेडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments