गावाच्या विकासासाठी युवकांची धडपड आसेमं युवा तालुकाध्यक्ष कार्यकर्त्यांसह उपस्थितांनी रावेर पंचायत समितीत दाखल गटविकास अधिकारी दिले निवेदन...
गावाच्या विकासासाठी युवकांची धडपड
आसेमं युवा तालुकाध्यक्ष कार्यकर्त्यांसह उपस्थितांनी रावेर पंचायत समितीत दाखल गटविकास अधिकारी दिले निवेदन
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील आभोडा गावात विकासात्मक कामे व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची असलेली १५ऑगष्ट दिनानिमित्त होणारी ग्रामसभा काही कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ती सभा घेण्यात यावी याकरिता आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे रावेर युवा तालुका अध्यक्ष सॅम तडवी यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत रावेर पंचायत समिती कार्यालय गाठले व आपल्या मागण्यांचे निवेदन तसेच ग्रामसभा घेण्याचा दिवस वेळ ठरवून देण्यासाठी रावेर गटविकास अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सोपविले
यावेळी संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी प्रदेशाध्यक्ष कामिल नामदार तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलीखा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री प्रवीण शिंदे यांना निवेदन देतांना
सॅम तड़वी, सचीन चौहान, गजेन्द्र पवार, लुकमान तड़वी, अख्तर तड़वी , आरीफ तड़वी, आमिन तड़वी, योगेश पवार, अंकुश पवार , अल्ताफ तड़वी, सादिक तड़वी, सुल्तान कुरेशी, इमरान कुरेशी सलमान तड़वी समीर तड़वी नसिब तड़वी इदु तड़वी, आशिक तड़वी, रोहीत पवार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते
प्रतिक्रिया
ग्रामपंचायत ची ग्रामसभा निमित्ताने १८ ऑगस्ट रोजी ग्रामसभा बैठक निश्चित केली होती दवंडी दिली होती पण ऐनवेळेवर रद्द करण्यात आल्याने आणि ग्रामस्थांनी येत्या मंगळवार पर्यंत ग्रामसभा बैठक घेण्यात आली नाही तर पंचायत समिति कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे

No comments