रक्षाबंधनाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी यांना राखी बांधून परंपरा आणि संस्कृतीचा सण उत्साहात साजरा वरणगाव, अरुण धनगर (संपादक -:- हेमकांत ग...
रक्षाबंधनाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी यांना राखी बांधून परंपरा आणि संस्कृतीचा सण उत्साहात साजरा
वरणगाव, अरुण धनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महिला साठी सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या वरणगाव पोलीस दलातील पोलीस बांधवाना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून कृतज्ञता, स्नेह आणि आपुलकीचा अनोखा बंध जपला !
कर्तव्य बजावताना स्वतःची पर्वा न करता समाजाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या आपल्या पोलीस बांधवांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता! जे अहोरात्र नागरिक साठी आणि आपल्या रक्षणासाठी तत्पर असतात, त्यांचे हात रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला कधीही रिकामे राहता कामा नयेत. म्हणून रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर आम्ही सर्व जण पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकारी बांधवांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तुमचे हे निःस्वार्थ समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा हीच देशाची खरी ताकद आहे. रक्षाबंधन निमित्त महिला दक्षता समिती व हिरकणी फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी अमीत कुमार बागुल साहेब, पी. एस. आय. बेडकुळे साहेब व पोलिस कर्मचारी यांना राखी बांधून कृतज्ञता, स्नेह आणि आपुलकीचा अनोखा बंध जपला.
यावेळी सविता ताई माळी, रेखाताई देशमुख, शिलाबरी ताई जगदाळे, लक्ष्मी ताई बैरागी, निलीमा ताई झोपे, निर्मला ताई जावरे, ज्योती ताई गुरव, सोनीया. लोंढे(गायकवाड), कविता जाधव, सरूबाई वाघमारे, कमलाबाई माळी, सुवर्णा धनगर, जिजाबाई माळी, रेखा गायकवाड आदी महिला उपस्थित होते.

No comments