साईदरबारी दानाचा महासंगम! श्रावणाच्या मुहूर्तावर शिर्डीत सुवर्णवर्षाव; बंगळुरूच्या भक्ताकडून तब्बल २१ लाखांचे सोने,तर SBI बँकेकडून कडून ७०...
साईदरबारी दानाचा महासंगम! श्रावणाच्या मुहूर्तावर शिर्डीत सुवर्णवर्षाव; बंगळुरूच्या भक्ताकडून तब्बल २१ लाखांचे सोने,तर SBI बँकेकडून कडून ७० लाखांची अत्याधुनिक भेट!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर - श्रावण मासाच्या पहिल्याच मंगलदिनी शिर्डीतील श्री.साईबाबांच्या पावन दरबारात भक्ती,श्रद्धा आणि दानाचा एक अनोखा आणि अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला.साईबाबांवर देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून श्रावणाच्या आरंभाला बंगळुरू येथील एका अज्ञात दानशूर भक्ताने साईचरणी २१ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे सोन्याचे दान अर्पण केले,तर देशातील अग्रगण्य स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) लाखो भाविकांच्या सोयीसाठी ७० लाख रुपयांचे परदेशी बनावटीचे ऑटोमॅटिक डिशवॉशर संस्थानला भेट दिले.श्रावणाच्या पहिल्या दिवशी बंगळुरू येथून आलेल्या एका साईभक्ताने स्वतःचे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर साईचरणी मौल्यवान सोन्याचे बिस्किट व नाणी अर्पण केली.साईदरबारात अशा वेगवेगळ्या वजनांची सोन्याची बिस्किटे एकाच वेळी अर्पण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.साईबाबा प्रसादालयात दररोज ४५ ते ५० हजार भाविक श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतात.या भाविकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेत सुमारे ७० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक परदेशी मशीन दान केले आहे.श्रावणाच्या पहिल्याच दिवशी साईचरणी भक्ती आणि सेवेचा हा अनोखा संगम घडला आहे.मौल्यवान सुवर्णदान देणारे बंगळुरूचे गुप्त साईभक्त आणि प्रसादालयासाठी ७० लाख रुपयांचे अद्ययावत डिशवॉशर देणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापन या दोघांचेही साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री साईबाबा संस्थान गोरक्ष गाडीलकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

No comments