adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुटखा-मटक्याच्या विळख्यात निलंगा ? मटक्याला आळा घालण्याची नागरिकांनी केली प्रशासनाकडे मागणी.

 गुटखा-मटक्याच्या विळख्यात निलंगा ?  मटक्याला आळा घालण्याची नागरिकांनी केली प्रशासनाकडे मागणी. लातूर,जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमक...

 गुटखा-मटक्याच्या विळख्यात निलंगा ?

 मटक्याला आळा घालण्याची नागरिकांनी केली प्रशासनाकडे मागणी.


लातूर,जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मटक्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने तक्रारींची तातडीने पडताळणी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी. अवैध जुगारप्रकारांना आळा घालण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

निलंगा:- निलंगा शहरासह तालुक्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री तसेच मटका सुरू असल्याच्या तक्रारी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शासनाने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही काही ठिकाणी तो सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मटक्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असल्याने या दोन्ही प्रकारांविरोधात प्रभावी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषतः तरुणाईमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असताना प्रत्यक्षात बंदी असलेला गुटखा उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी गंभीर मानल्या जात आहेत.


शहरातील काही पानटपऱ्या, दुकाने आणि गर्दीच्या ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या तक्रारींची प्रशासनाने तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत.

आहे. तरुणाईच्या आरोग्याचा प्रश्नगुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर - गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि - तरुणांपर्यंत हे पदार्थ पोहोचू नयेत, - यासाठी संबंधित विभागाने नियमित तपासणी मोहीम राबविण्याची गरज आहे. केवळ गुटखा विक्री करणाऱ्या किरकोळ दुकानदारांवर कारवाई न करता, त्यामागील पुरवठा साखळी शोधून काढण्याची मागणीही नागरिकांतून होत आहे. गुटखा कुठून येतो, त्याचा पुरवठा कोण करतो आणि तो कोणत्या मार्गाने तालुक्यात पोहोचतो, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

No comments