गौरव साळुंखे आता भीलवाडा नगर विकास न्यासचे सचिव विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथील आयएएस अधिकारी व 2021 च्या यू...
गौरव साळुंखे आता भीलवाडा नगर विकास न्यासचे सचिव
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील आयएएस अधिकारी व 2021 च्या यूपीएससी महाराष्ट्र केडर चे अधिकारी गौरव रवींद्र साळुंखे यांच्याकडे आता राजस्थान मधील भीलवाडा नगर विकास न्यास(युआयटी) च्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मूळगाव खेडगाव (ता चाळीसगाव) येथील रहिवासी असलेल्या व वडिलांच्या नोकरीनिमित्त चोपडा येथे स्थायिक झालेले गौरव साळुंखे 2021 मध्ये आयएएस उत्तीर्ण होऊन राजस्थान मधील प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वी माउंट आबू येथील प्रांताधिकारी व अलवर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. वेतन श्रृंखला श्रेणीतील त्यांची ही वरिष्ठ पदोन्नती आहे. श्री साळुंखे यांना शिक्षण, ग्रामीण विकास व युवक कल्याण विषयात विशेष रुची असून यापूर्वीच्या त्यांच्या सेवेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे सिद्ध झाले आहे.

No comments