adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मेळावा पाचोऱ्यात उत्साहात संपन्न

 ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मेळावा पाचोऱ्यात उत्साहात संपन्न  पाचोरा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पाचोरा : ग्रामपंचायत कर्मचा...

 ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मेळावा पाचोऱ्यात उत्साहात संपन्न 


पाचोरा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पाचोरा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या, मागण्या तसेच आगामी काळात जिल्हास्तरावर मोठे आंदोलन उभारून प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मेळावा पाचोरा येथील रामदेव लॉनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या मेळाव्यात पाचोरा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष संतोष खरे व उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र खरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 


यावेळी सुनील निकम यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी, पत्रकार चंदू भाऊ खरे यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी, तर नीलेश कोल्हे यांची तालुका उपाध्यक्षपदी, चेतन राजपूत यांची सचिवपदी, गौतम साल्वी यांची सहसचिवपदी आणि प्रवीण चौधरी यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली.

मेळाव्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारून प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्याबाबतही चर्चा झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनियुक्त तालुका अध्यक्ष सुनील निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन राजपूत, नीलेश गोपाल यांच्यासह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या मेळाव्यास ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

No comments