adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काटेरी झाडाझुडपांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा; नंदाताई महाजन यांच्या पाठपुराव्याने जेसीबीद्वारे स्वच्छता

 काटेरी झाडाझुडपांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा; नंदाताई महाजन यांच्या पाठपुराव्याने जेसीबीद्वारे स्वच्छता  यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...

 काटेरी झाडाझुडपांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा; नंदाताई महाजन यांच्या पाठपुराव्याने जेसीबीद्वारे स्वच्छता 


यावल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल शहरातील ताकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर, तसेच बसमाळाजवळील परिसरात मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडे, झुडपे आणि गवत वाढल्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडाझुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. पादचारी, दुचाकीस्वार तसेच मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

ही समस्या लक्षात घेऊन भाजपाच्या गटनेत्या तथा नगरसेविका नंदाताई राजेंद्र महाजन यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले. केवळ तोंडी आश्वासनावर न थांबता त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे प्रत्यक्ष निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

नंदाताई महाजन यांनी स्वतः प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नगरपालिकेच्या माध्यमातून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगत वाढलेली काटेरी झाडे-झुडपे हटविण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे रस्ता मोकळा झाला असून नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेषतः ताकेश्वर मंदिराकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने भाविक, नागरिक आणि वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्ता स्वच्छ व सुरक्षित ठेवणे आवश्यक होते. नंदाताई महाजन यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणीची दखल घेऊन तातडीने प्रशासनाकडून काम करून घेतल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

“नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी केवळ निवेदने देणे नव्हे, तर प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे हीच आमची भूमिका आहे,” अशी भावना नंदाताई महाजन यांनी व्यक्त केली.या कामामुळे परिसरातील नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून नंदाताई महाजन यांच्या तत्परतेचे आणि प्रत्यक्ष काम करून घेण्याच्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments