खामगावात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. बाबास...
खामगावात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त लहुजी विद्रोही सेना, खामगाव शहरच्या वतीने उभारण्यात आलेल्या भोजन स्टॉलला खामगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Addl. SP) पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) प्रदीप पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष रुपेश अवचार व त्यांच्या सहकाऱ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देत समाजहिताचे कार्य असेच सातत्याने सुरू ठेवण्याचा संदेश दिला.
लहुजी विद्रोही सेना, खामगाव शहर संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्सवानिमित्त मंडळातील कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोळी व काशीफळाच्या भाजीचे भोजन सर्वांना देण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी पवन माळवंदे, रामा गायकवाड, देवराव अवचार, हरिभाऊ अवचार, देविदास धमेरीया, नामदेव अवचार, प्रभाकर गायकवाड, अविनाश ईगळे, आकाश गायकवाड, प्रविण रिछारिया, डॉन धमेरीया, सचिन अवचार, कपिल अवचार, ओम अवचार, हर्ष धमेरीया, करण अवचार, अभय धमेरीया, वेदांत धमेरीया यांच्यासह लहुजी विद्रोही सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खामगाव शहरातील मातंग समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments