adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. ई. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहात साजरा; विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन!

 जे. ई. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहात साजरा; विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन!   प्रा. सतिश गायकवाड मुक...

 जे. ई. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहात साजरा; विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन! 


 प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येथील नामांकित जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' अत्यंत उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी आणि क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे विशेष आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, आणि एस. एम. वाढे तसेच क्रीडा विभागाचे शिक्षक एस. जे. मोरे व एस. एन. भोळे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा विभागाच्या वतीने मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या मैदानी  खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये झुंबा नाच,धावणे, लांब उडी, लंगडी यांसारख्या मैदानी स्पर्धांसह बुद्धिबळ आणि कॅरम अशा इनडोअर स्पर्धांचाही समावेश होता. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये अत्यंत उत्साहाने आणि खिलाडूवृत्तीने सहभाग घेतला. मैदानावर विद्यार्थ्यांचा उत्साह आणि घोषणांमुळे क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

 सूत्रसंचालक एस आर ठाकूर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख करीत दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायामाचे असणारे महत्त्व सोप्या शब्दांत समजावून सांगितले.या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक एस. एम. वाढे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना क्रीडा आणि सुदृढ आरोग्य राखण्याची शपथ दिली.यानंतर विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून खेळांबद्दलची आपली आवड व कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याला शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा शिक्षकांच्या योग्य नियोजनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हा क्रीडा दिन अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला.

No comments