अहिल्यानगरात फिल्मी स्टाईल थरार..! एसटी कर्मचाऱ्याचे भररस्त्यातून दुचाकीवरून अपहरण बुरुडगाव रस्त्यावर नेऊन बेदम मारहाण करत लुटले सचिन मोकळ...
अहिल्यानगरात फिल्मी स्टाईल थरार..! एसटी कर्मचाऱ्याचे भररस्त्यातून दुचाकीवरून अपहरण बुरुडगाव रस्त्यावर नेऊन बेदम मारहाण करत लुटले
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- भरदिवसा गजबजलेल्या पुणे बसस्थानक परिसरातून एसटी कर्मचाऱ्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची आणि निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या खळबळजनक प्रकारामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात गुंडांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील
चिखली येथील रहिवासी आणि एसटी महामंडळात कार्यरत असलेले संग्राम गोपाळकृष्ण झेंडे (वय ३३) हे १५ ऑगस्टच्या सायंकाळी सातच्या सुमारास पुणे बसस्थानक परिसरात थांबले होते.याच दरम्यान काळ्या रंगाच्या दुचाकीवरून २२ ते २३ वयोगटातील तीन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी थेट संग्राम झेंडे यांना धमकावत जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि थेट बुरुडगाव रस्त्याच्या दिशेने सुसाट पळ काढला.बुरुडगाव रस्त्यावरील निर्जन भागात नेऊन त्या तिघांनी झेंडे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता गुंडांनी त्यांचा महागडा मोबाईल हिसकावून घेतला आणि मारहाणीचा धाक दाखवत ऑनलाईन पेमेंटचा गुप्त पासवर्ड विचारून घेतला. त्यानंतर एका दुकानाच्या खात्यावर ७ हजार १०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून ती रोकड स्वतःलाटली.
या जीवघेण्या हल्ल्यातून सुटका झाल्यानंतर संग्राम झेंडे यांनी थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तिघा अज्ञात आरोपीं विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे करत आहेत.शहरातील मुख्य बसस्थानक परिसरातूनच अशा प्रकारे अपहरण करून लूटमार झाल्याने प्रवाशांच्या व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments