adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत समाजकार्य महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन

 राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत समाजकार्य महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा व नगरपरिषदेच्या...

 राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत समाजकार्य महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक

स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन 

चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि नगरपरिषद चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृह, चोपडा येथे ‘राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयीन स्तरावरील ‘वंदे मातरम्’ या गटामध्ये भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रभक्तीपर गीताचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सुरेल व दमदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेत महाविद्यालयाच्या मोहिनी पाटील, दिव्या कोळी, शिवानी सोनगिरे, अनिता पावरा, रोशनी पावरा, दिव्या धनगर आणि नफिसा तडवी या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर व उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी तसेच सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी मा. देवयानी माळी मॅडम, मा. भावेश लोहार सर आणि प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

No comments