आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत संघर्ष समितीच्या विदर्भ संपर्क प्रमुखपदी ज्ञानेश्वर काशीराम खवले यांची नियुक्ती अमोल बावस्कार बुलढाण...
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत संघर्ष समितीच्या विदर्भ संपर्क प्रमुखपदी ज्ञानेश्वर काशीराम खवले यांची नियुक्ती
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलडाणा: आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी, कोळी ढोर व जमातीच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत संघर्ष समितीच्या विदर्भ संपर्कप्रमुखपदी मा. श्री. झानेश्वर काशीराम खवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. दत्ताभाऊ सुरवसे यांच्या आदेशानुसार तसेच डॉ.मनोहर कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजामध्ये जनजागृती व संघटन मजबूत करण्याची जबाबदारी नवनियुक्त विदर्भ संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर खवले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.तसेच संघटनेचा विस्तार करून आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी व कोळी ढोर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या नियुक्तीमुळे विदर्भातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून, समाजातील बांधवांना एकत्रित करून त्यांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.नवनियुक्त विदर्भ संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर काशीराम खवले यांचे संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
जय आदिवासी! जय राघोजी! जय जोहार! जय वाल्मिकी!

No comments