सार्वजनिक विद्यालय येथे हिंदी दिन साजरा अडावद प्रतिनिधी रवींद्र कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) अडावद ता १५ अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक...
सार्वजनिक विद्यालय येथे हिंदी दिन साजरा
अडावद प्रतिनिधी रवींद्र कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अडावद ता १५ अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक विद्यालय अडावद येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक . कदम यांनी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी माता सरस्वतीचे प्रतिमापूजन केले. त्यानंतर इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी माहिती दिली. राष्ट्रभाषा, जल-जंगल-जमीन, देशातील समाज सुधारक इ. विषयांची माहिती देणारी भाषणे हिंदी भाषेतून सादर केलीत. यानंतर विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत माहितीपूर्ण आणि मनोरंजक अशा नाटिका सादर केल्या. विद्यालयातील हिंदी अध्यापीका श्रीमती शुभांगी देशमुख, श्रीमती ज्योती पाटील, श्रीमती सारिका चरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आकर्षक ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कदम यांनी हिंदी भाषेतून अध्यक्षीय भाषण केले, विद्यार्थ्यांना नेहमी हिंदी तासिकेला व आज हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेतच बोलण्याचे आवाहन केले. . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका चरडे यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments