adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीसाठी, स्वराज्य पक्षाचे एसडीओ कार्यालयात आंदोलन. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास रस्त्यावर उतरू, प्रशांत डिक्कर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीसाठी, स्वराज्य पक्षाचे एसडीओ कार्यालयात आंदोलन. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास रस्त...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीसाठी, स्वराज्य पक्षाचे एसडीओ कार्यालयात आंदोलन.

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास रस्त्यावर उतरू, प्रशांत डिक्कर 






जळगाव जा. (प्रतिनिधी) 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


महाराष्ट्रात बळीराजा हा केवळ राजकीय भाषणांचा आणि घोषणांचा विषय उरला आहे की काय, असा सरकारवर गंभीर आरोप करीत, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह आज एसडीओ कार्यालयात आंदोलन केले आहे,

 जिल्ह्यात सलग ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या ओढीमुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यांदेखत जळून खाक झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी, सरकार मात्र कागदी पाहणी आणि संथ कार्यपद्धतीत व्यस्त आहे. पीकविमा कंपन्या तुटपुंजी भरपाई देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत. केवळ घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष जमिनीवर होणारी होरपळ का दिसत नाही, असा प्रश्न डिक्कर यांनी उपस्थित केला आहे,

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने सरकारकडे शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या स्पष्ट मांडल्या आहेत, जिल्ह्यात कोणत्याही अटींशिवाय तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा,जळालेल्या पिकांसाठी हेक्टरी १ लाख रुपये विशेष भरपाई व १००% पीकविमा द्यावा,सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा, आणि रब्बीसाठी नवीन पीककर्ज तात्काळ सुरू करावे,शेतमजूर भुमिहीन कुटुंबांना ५०,००० रु.ची आर्थिक मदत आणि विद्यार्थ्यांची १००% फी माफ करावी, सरकारने केवळ पोकळ आश्वासने न देता या मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशांत डिक्कर यांनी आज दिला आहे, यावेळी उज्वल पाटील चोपडे,विठ्ठल वखारे, उज्वल चोपडे, सुरेश तोटे,गौरव जळमकार, विजूभाऊ काळपांडे, अमोल मारोडे, सागर वाघ, प्रणव धामोडे, मंगेश लव्हाळे, गोपाल वखारे, वैभव मुरूख, प्रमोद घोडे,अक्षय वाकोडे, विशाल चोपडे, दिगंबर वानखडे, घनश्याम ताटे, अभिषेक कोकाटे , तुषार जाधव, गणेश निर्मळ, रामकृष्ण गावंडे, सुनील बाहोदरे, वासुदेव पुंडे, अमोल आगरकर, सह शेतकरी उपस्थित होते..

No comments