लहुजी नगरमधील विस्थापित महिलांच्या पुनर्वसनासाठी नगराध्यक्षांना निवेदन शेगांव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) शेगाव: शहरातील लहुजी न...
लहुजी नगरमधील विस्थापित महिलांच्या पुनर्वसनासाठी नगराध्यक्षांना निवेदन
शेगांव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शेगाव: शहरातील लहुजी नगर, मुरारका शाळेजवळील ता. क्रीडा संकुलासाठी विस्थापित झालेल्या महिलांच्या पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह पुनर्वसनाच्या मागणीसाठी १६ सप्टेंबर २०२६ रोजी मा. नगराध्यक्ष प्रकाश एकनाथ शेगोकार यांना निवेदन सादर करण्यात आले.लहुजी नगर परिसरातील महिलांना क्रीडा संकुलाच्या कामामुळे विस्थापित व्हावे लागले असून, त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विस्थापित महिलांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी माजी न.पा. उपाध्यक्ष नितीन शेगोकार, नगरसेवक इंगळे,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जी. ओ. तायडे, संजय जाधव तसेच लहुजी नगर परिसरातील विस्थापित महिला उपस्थित होत्या.
यावेळी कोमल तायडे, अरुणा म्याटरे, कुसुमबाई वानखडे, कमला सावळे, देवकाबाई नुपनारायण, रायमीन बी, पुष्पा वानखडे यांच्यासह इतर महिलांनी उपस्थित राहून आपल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी निवेदन दिले.
विस्थापित महिलांच्या निवासाचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेऊन पर्यायी जागा व पुनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments