खिर्डी बु. येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वातीन लाखांचा ऐवजलंपास 3 लाख 22 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; निंभोरा पोलिसां...
खिर्डी बु. येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वातीन लाखांचा ऐवजलंपास
3 लाख 22 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; निंभोरा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
खिर्डी गावात तब्बल तिसरी घरफोडी पोलिसांसमोर मोठे आव्हान
प्रतिनिधी रावेर मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
खिर्डी बुद्रुक (ता. रावेर) येथे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 3 लाख 22 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहनाज शेख अखतर (वय ४२, व्यवसाय गृहिणी, रा. खिर्डी बु., ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १८६/२०२६ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपासून ते १४ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा हार, सोन्याची पोत तसेच चांदीच्या दोन छन्न्यांचा समावेश आहे. याशिवाय ओम साई राम बचत गटाच्या भरणा रकमेसह ५४ हजार रुपये आणि अन्य ३५ हजार रुपये, अशी एकूण ८९ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली.
या घटनेत एकूण २५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ८९ हजार रुपयांची रोकड, असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. एकूण चोरीची किंमत 3 लाख 22 हजार 330 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे खिर्डी परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान निंभोरा पोलिसांसमोर आहे. मागील दोन महिन्यातील दोन घटना चोरटे सापडेना आता तिसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे व पोहेकॉ. रिजवान पिंजारी करीत आहे.

No comments