adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुक्यातील खिर्डीत तिसऱ्यांदा घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने ८९ हजारांची रोकडसह सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास!

रावेर तालुक्यातील खिर्डीत तिसऱ्यांदा घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने ८९ हजारांची रोकडसह सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास! रावेर प्रतिनिधी मुबारक तडव...

रावेर तालुक्यातील खिर्डीत तिसऱ्यांदा घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने ८९ हजारांची रोकडसह

सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास!



रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यांत घरफोडी ची तीसरी घटना घडली आहे खिर्डी बुद्रुक येथील अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ८९ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख २२ हजार ३३० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपासून १४ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजेच्या दरम्यान घडली. शहनाज शेख अख्तर (वय ४२, गृहिणी, रा. खिर्डी बु) यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी शहनाज अख्तर या घराबाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने संधी साधून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची झडती घेत त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन चोरटा पसार झाला. घरातील वस्तू अस्ताव्यस्त झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर घटनेची माहिती निंभोरा पोलिसांना देण्यात आली. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा हार, सोन्याची पोत तसेच चांदीच्या दोन छन्न्यांचा समावेश आहे. एकूण २५ ग्रॅम सोन्याचे दागिने व ४०० ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत.

यासोबत ओम साई राम बचत गटाच्या भरणा रकमेसह ५४ हजार रुपये आणि अन्य ३५ हजार रुपये, अशी एकूण ८९ हजार रुपयांची रोकडही चोरट्याने लंपास केली.

No comments