आसेमं परिवाराचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा! यावल येथे ४ आक्टोंबर ला कार्यक्रम रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संप...
आसेमं परिवाराचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा!
यावल येथे ४ आक्टोंबर ला कार्यक्रम
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शिक्षकांच्या आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी यावल पंचायत समिती येथे शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांच्या योगदान विद्यादान कार्याचा सन्मान आणि गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार व शिक्षणामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्याच्या गुणवत्ता ,यशाला प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
आसेमं आदिवासी सेवा मंडळ परिवाराच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या एकमताने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सलग अविरतपणे चार वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कारांचे तर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यांचे अकरावे वार्षिक कार्यक्रम संपन्न केला जाणार आहे. या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणान्या शिक्षकांचा सन्मान तसेच गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित विशेष बैठकीस आसेमं परिवारांचे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी प्रदेश अध्यक्ष कामील तडवी, ईरफान तडवी सर अनिल तडवी सर मंहमद तडवी सर जिल्हाध्यक्ष मुबारक अली खाँ तडवी गफूर तडवी जनाब विनोद तडवी असलम तडवी जुम्मा तडवी उस्मान तडवी अलाउद्दीन तडवी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनी ओसेमं परिवाराच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून आगामी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या समाज कार्य उपक्रम सामाजिक कार्याने प्रभावित होऊन संघटनेमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांना संघटानात्मक जबाबदारी सोपविण्यात आली.
आसेमं संघटनेच्या विचार कार्यपद्धती समाज कार्याला अधिक बळ देण्यासाठी युवा कार्यकर्त्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
यामध्ये समीर तडवी आभोडा येथील यांची रावेर युवा तालुका अध्यक्ष पदी तर जुम्मा तडवी (मोहमाइली) यांची युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी वसीम रहिमान तडवी यांची युवा यावल तालुका कार्याध्यक्ष,अकील युसूब तडवी यांची यावल तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकान्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. युवकांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याबरोबरच शिक्षकांच्या कार्याला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या या उपक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार असून, 4 ऑक्टोबर रोजी होणान्या पुरस्कार व गुणगौरव सोहळ्यात समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आसेमं महापरिवार तर्फे करण्यात आले आहे.

No comments