मोठा वाघोदा येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक : हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा ...
मोठा वाघोदा येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा आला..तसेच प्रवेशद्वाराचे अनावरण ही करण्यात आले..श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त व गोपाळकाला निमित्त गावातून फुलारी आईची पालखी सोहळा संपन्न झाला ही पालखी श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम येथून काढण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले तर तरुणांतर्फे ठीक ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. सडारांगोळी टाकण्यात आलेली होती. तसेच सायंकाळी पाच वाजता बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर श्रीकृष्ण सांस्कृतिक ग्रुप मंडळाच्या व नुतन गणेश मंडळाच्या प्रवेशव्दार फलकाचे अनावरण श्रीकृष्ण मंदीराचे दिवाकर बाबा डि.के महाजन.श्रावण महाजन.किशोर पाटील.यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थ व गोफ मंडळातर्फे सर्व सदस्य उपस्थित होते..श्रीकृष्ण गोफ मंडळातर्फे बसस्थानक परिसरात मोठी दहीहंडी बांधण्यात आली होती.गोविंदानी तीन ते चार थर लाऊन दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला


No comments