लोणवडी येथे महिला बचत गटासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावस्कर (संपादक : हेमकांत गायकवाड) मलकापूर तालुक्यात...
लोणवडी येथे महिला बचत गटासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावस्कर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुक्यातील गावातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर लोणवडी ग्रामपंचायतीकडे महिला बचत गटासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले.महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग, घरगुती व्यवसाय, खाद्यपदार्थ निर्मिती, वस्तू निर्मिती तसेच इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील. त्यासाठी नियमित बैठका, प्रशिक्षण, मार्गदर्शन व विविध उपक्रम राबविण्यासाठी योग्य जागेची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सध्या महिला बचत गटाच्या बैठका व विविध उपक्रमांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने महिला बचत गटासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी icrp सौ.मनिषा भारंबे, सौ.सुरेखा चोपडे तसेच गावातील महिला बचत गटातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
ग्रामपंचायतीने महिलांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून महिला बचत गटासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments