प्रभात गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात साक्री प्रतिनिधी जितेंद्र गुरव (संपादक : हेमकांत गायकवाड) साक्री:- प्रभात गणेश मित्र मं...
प्रभात गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात
साक्री प्रतिनिधी जितेंद्र गुरव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
साक्री:- प्रभात गणेश मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
धुळे येथील जीवन ज्योती ब्लड बँकेच्या वतीने डॉ. बाळासाहेब गव्हाणे व योगेश महाले यांच्या पथकाने रक्तसंकलन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभात गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक उपक्रमाला सहकार्य केले.


No comments