चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली! तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा;४३ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप चोपडा तालुका...
चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली!
तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा;४३ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
चोपडा तालुका प्रतिनिधी :अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या चोपडा तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा रविवारी करण्यात आली. जनसेवा हॉस्पिटल,चोपडा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात तालुका,शहर तसेच विविध सेल व आघाड्यांवरील एकूण ४३ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते तथा आदिवासी सेलचे कार्याध्यक्ष चंद्रकांत जामसिंग बारेला,जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील,महिला प्रदेश उपाध्यक्ष विजया ताई पाटील,महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनेश बाविस्कर यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी
नव्या कार्यकारिणीत दिनेश बाविस्कर यांची तालुकाध्यक्षपदी,तर सचिन मच्छिंद्र डाभे(वर्डी) यांची चोपडा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.सतीश पाटील (दोंदवाडे) यांच्यावर तालुका कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून समाधान भागवत पाटील यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच युवक,महिला,विद्यार्थी, आदिवासी,सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक,ओबीसी, किसान,भटके-विमुक्त,अपंग तसेच मीडिया विभागातही नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध सेलच्या माध्यमातून संघटन विस्तारावर भर
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये दीपक पाटील – चोपडा युवक विधानसभा अध्यक्ष,अलका कोळी – महिला तालुका अध्यक्ष, योगेश चौधरी – युवक तालुका अध्यक्ष, ऋषिकेश बाविस्कर – विद्यार्थी तालुका अध्यक्ष, अल्केश महाजन – युवक शहराध्यक्ष,सुनील पाटील – मीडिया शहराध्यक्ष, सखाराम सोनवणे – आदिवासी सेल तालुका अध्यक्ष,प्रमोद शिरसाठ – सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष, अश्रफ खान शिकलकर – अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष, समाधान माळी – ओबीसी सेल तालुका अध्यक्ष, धनराज पाटील – किसान सेल तालुका अध्यक्ष, खेमचंद धनगर – भटके-विमुक्त सेल तालुका अध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
याशिवाय नंदाताई बारेला यांची जिल्हा सरचिटणीसपदी,हेमंत भिल यांची जिल्हा उपाध्यक्ष,आदिवासीपदी, विठ्ठलराव साळुंखे यांची जिल्हा सामाजिक न्याय उपाध्यक्षपदी,नंदलाल भिल यांची जिल्हा सरचिटणीस, आदिवासी सेलपदी, तसेच रविंद्र पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाने सोपविलेली संघटनात्मक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा तसेच पक्षाची विचारधारा आणि संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
चोपडा तालुका व शहरातील विविध स्तरांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी सक्रियपणे कार्यरत राहतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती
प्रमोद बापू पाटील – जळगाव जिल्हाध्यक्ष,कल्पिता पाटील – महिला जिल्हाध्यक्ष,सुरेश पगारे – सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष,मजहर पठाण – अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष,विजया ताई पाटील – महिला प्रदेश उपाध्यक्ष,डॉ.चंद्रकांत बारेला – महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा कार्याध्यक्ष,आदिवासी सेल,महाराष्ट्र प्रदेश होती.



No comments