adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आता बहुजन समाज पार्टी व मानवाधिकार संघटना मैदानात! नाशिक विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा; मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी, जखमींना ५० लाखांची भरपाई देण्याची मागणी

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आता बहुजन समाज पार्टी व मानवाधिकार संघटना मैदानात! नाशिक विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा; मृत विद्यार्थ्यांच...

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आता बहुजन समाज पार्टी व मानवाधिकार संघटना मैदानात!

नाशिक विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा; मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी, जखमींना ५० लाखांची भरपाई देण्याची मागणी




नाशिक प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बालसंरक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून, मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी एक कोटी रुपये, तर जखमी विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.


आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची नियमित तपासणी, निवास व्यवस्था, आरोग्य सुविधा, कर्मचारी उपस्थिती आणि आपत्कालीन यंत्रणा यांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, याची जबाबदारी संबंधित प्रकल्प कार्यालय व अपर आयुक्त कार्यालयावर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


प्रशासकीय कर्तव्यात निष्काळजीपणा किंवा कर्तव्यच्युती आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी आणि चौकशीदरम्यान दोषी अधिकाऱ्यांना पदापासून दूर ठेवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


दरम्यान, शाळेची मान्यता रद्द झाली असल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शासकीय आश्रमशाळांमध्ये तातडीने प्रवेश द्यावा. आवश्यक असल्यास स्वतंत्र शासकीय आश्रमशाळा सुरू करावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक व सामाजिक पुनर्वसनासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे जळगाव जिल्हा महासचिव तथा राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बालसंरक्षण परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन बाविस्कर, प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण (भैय्या) विजय बनसोडे आणि महिला विंग प्रदेशाध्यक्षा निशा भालेराव (बनसोडे) यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या.


यावेळी विद्यार्थ्यांना धीर देत, “विद्यार्थ्यांनी स्वतःला एकटे समजू नये; आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा ठाम विश्वास पदाधिकाऱ्यांनी दिला.


विद्यार्थ्यांचा प्रश्न हा केवळ आंदोलनाचा विषय नसून त्यांच्या जीविताची सुरक्षा, शिक्षणाचे भवितव्य आणि मानवी हक्कांचा प्रश्न असल्याने शासनाने तातडीने या मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments