adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगावात छोट्या व्यापाऱ्यांवरील कारवाई तात्काळ थांबवा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार - मनसेचा महापालिकेला इशारा

जळगावात छोट्या व्यापाऱ्यांवरील कारवाई तात्काळ थांबवा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार - मनसेचा महापालिकेला इशारा  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- ह...

जळगावात छोट्या व्यापाऱ्यांवरील कारवाई तात्काळ थांबवा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार - मनसेचा महापालिकेला इशारा 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगाव शहरात सणासुदीच्या काळात रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले आणि लघुउद्योजक यांच्यावरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली..

मनसेने म्हटले आहे की, शहर नियोजनासाठी अतिक्रमण मोहीम आवश्यक आहे, परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली फक्त सामान्य गरीब माणसावरच कारवाई करायची आणि मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांनी पदपथापासून ते रस्त्यापर्यंत केलेल्या मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करायचे, हा दुहेरी निकष मनसे कदापि खपवून घेणार नाही

आज बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना अनेक तरुण स्वतःचा छोटा व्यवसाय करून, कोणाकडेही हात न पसरता आपला संसार चालवत आहेत. यामध्ये आईस्क्रीम गाडी, पाणीपुरी, भाजीपाला, फळ विक्रेते, चहा-नाश्ता, फुले, पूजेचे साहित्य, खेळणी विकणारे यांचा समावेश आहे. प्रत्येक हातगाडी मागे एक कुटुंब आहे.

सध्या गणपती, नवरात्र उत्सवाचा काळ आहे. या काळात हे व्यापारी थोडे अधिक उत्पन्न मिळविण्याच्या आशेने रस्त्याच्या कडेला व्यवसाय करतात. अशा वेळी अचानक कारवाई झाल्यास त्यांचे भांडवल जाते आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो.

मनसेचा थेट सवाल

आईस्क्रीमची गाडी अतिक्रमण आहे, तर मोठ्या दुकानाने पदपथावर केलेले अतिक्रमण काय आहे? पाणीपुरीची हातगाडी अतिक्रमण आहे, तर मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यापर्यंत वाढवलेली जागा काय आहे? कायदा असेल तर सर्वांसाठी समान असला पाहिजे.

मनसेच्या प्रमुख मागण्या:

1. सणासुदीच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांवरील कारवाई त्वरित थांबवावी.

2. त्यांना वाहतुकीला अडथळा न होणाऱ्या सुरक्षित पर्यायी जागा द्याव्यात.

3. मोठ्या प्रतिष्ठानांच्या अतिक्रमणांचीही समान निकषाने तपासणी करावी.

4. कारवाई पूर्वी सूचना देऊन पर्यायी व्यवस्था करावी.

5. छोट्या व्यापाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे.

6. बेरोजगार तरुणांना शासकीय योजनांशी जोडावे.

यावेळी महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने साहेब यांनी या विषयावर लवकरात लवकर अतिक्रमण  काढण्यात येईल सर्वांना समान वागणूक दिली जाईल आश्वासन देण्यात आले

शहराचे रस्ते मोकळे करा, पण गरीबांच्या हातातील काम हिरावून घेऊ नका. मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहराच्या वतीने देण्यात आला आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप  महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, चेतन पवार, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, बादशाह शहा, अलीम शहा, राजेश मराठे,  यांच्या सह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...

No comments