टेकवाडे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर तालुक्यातील टेकवा...
टेकवाडे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे मल्हार सेना, टेकवाडे आणि समस्त धनगर समाज, टेकवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी रवींद्र धनगर आणि प्रमोद धनगर यांच्या हस्ते राजमातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी संजय धनगर (माजी सरपंच) यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, राजमातांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणाचा आदर्श घालून दिला असून त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल धनगर, अजय धनगर,एकनाथ धनगर,हर्षल धनगर, गौरव धनगर आणि समस्त धनगर समाज, टेकवाडे येथील युवकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments