फैजपुर नगरपरिषदेत जन्म मृत्यू नोंदणी बारकोटच्या दाखले वितरणात सुरुवात इदू पिंजारी फैजपुर (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर नगरपरिषदेत जन्म...
फैजपुर नगरपरिषदेत जन्म मृत्यू नोंदणी बारकोटच्या दाखले वितरणात सुरुवात
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपरिषदेत जन्म- मृत्यू नोंदणी बारकोड च्या दाखले वितरणाला सुरुवात गेल्या बऱ्याच दिवसापासून नगरपरिषदेच्या वतीने दिले जाणारे जन्म व मृत्यू बारकोड असलेले दाखले प्रलंबित असल्याने यासंदर्भात नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद( पप्पू) चौधरी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन देऊन नागरिकांना होणाऱ्या अडचणी या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिल्या व त्याचाच एक भाग म्हणून आज पहिल्या टप्प्यात जवळपास 80 जन्म मृत्यू दाखल्याच्या ऑनलाईन मंजुरी जिल्हा परिषदेकडून मिळाल्यामुळे आज उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते आज या दाखले वितरणाला सुरुवात झाली.
उर्वरित पेंडिंग असलेल्या नोंदीहि येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेमध्ये मंजुरीसाठी पाठवून त्यांचीही ऑनलाईन मंजुरी मिळाल्यानंतर हे दाखले येत्या काही दिवसात वितरित केले जातील.
यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून बारकोड च्या दाखले वितरणाला झालेला विलंब यातून सुरळीत होणार असल्याने नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहेत.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद (पप्पू) चौधरी, नगरसेवक पवन सराफ, नगरसेवक इरफान मेंबर, आरोग्य सभापती हकीम तडवी, उपगटनेते सुरज गाजरे,राहुल गुजराथी, अनवर खाटीक, गबलू मेंबर व लिपिक अनिकेत साळुंखे यावेळी उपस्थित होते

No comments