adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाविद्यालयातील रासेयो एककाचा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम

महाविद्यालयातील रासेयो एककाचा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम पारोळा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) पारोळा येथील किसान महाविद्यालया...

महाविद्यालयातील रासेयो एककाचा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम



पारोळा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


पारोळा येथील किसान महाविद्यालयातील रासेयो एककामार्फत मंगळवार अंक २९ सप्टेंबर २०२९ रोजी पारोळा शहरातील मध्यवर्ती भागात स्थान असलेल्या भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम राबविला. सदर उपक्रमात रासेयो एककातील जवळपास ९५ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उपक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता संदर्भात सजगता निर्माण व्हावी म्हणून स्वच्छता शपथ कथन करण्यात आली. स्वच्छता शपथ नमुन्याचे वाचन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी केले. स्वयंसेवकांनी

ओला व सुका कचरा वेगवेगळा करून किल्ल्याच्या आवारातील प्लास्टिक व घनकचरा गोळा केला तसेच संपूर्ण आवार व गडाच्या तटबंदी झाडुन स्वच्छ केल्या. स्वच्छता पंधरवाडा हा भारत सरकारतर्फे राबवला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम असून त्याचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्यक्षात वैयक्तिक व सांघिक श्रमदानाद्वारे परिसर स्वच्छ ठेवणे हा आहे. हा उपक्रम प्रामुख्याने स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत रासेयो एककामार्फत सालाबादाप्रमाणे ठरवलेल्या कालावधीत म्हणजेच १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पाळला जात असल्याची माहिती रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी दिली तर या किल्ल्याला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून स्थानिक व्यापारी लोकांचे रक्षण करणे आणि सभोवतालच्या प्रांतांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक ४९ मध्ये ऐतिहासिक स्थळांचे वास्मारकांचे जतन करण्याचे तरतूद स्पष्ट केलेली असून किल्ल्याच्या आवारात रासेयो एकका मार्फत राबवलेला हा स्वच्छता उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छते विषयी जागृती निर्माण निर्माण करण्यास हातभार लावेल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी. एच. सोनवणे यांनी व्यक्त केले. सुषूम्ना माळी या स्वयंसेविकेने उपक्रमात सहभागी सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्याचे आभार मानले.

No comments