युवा उद्योजक तुषार खासबागे यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान सामाजिक व व्यावसायिक योगदानाची दखल; वरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा ...
युवा उद्योजक तुषार खासबागे यांना
‘राष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान
सामाजिक व व्यावसायिक योगदानाची दखल; वरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा
वरूड (जि.अमरावती) प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
वरूड येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते तुषार लक्ष्मणराव खासबागे यांच्या उद्योजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबतच सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कला जीवन बहुउद्देशीय संस्था, वरूड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते तुषार खासबागे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तुषार खासबागे यांनी अल्पावधीतच "माँ नर्मदा प्रिंटर्स’" च्या माध्यमातून वरूड तालुक्यात उद्योग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील युवकांसमोर उद्योजकतेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि मानवसेवेच्या भावनेतून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. युवकांनी पारंपरिक नोकरीच्या संकल्पनेपलीकडे जाऊन उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे आणि समाजाच्या विकासात योगदान द्यावे, हा संदेश तुषार खासबागे यांच्या कार्यातून मिळत आहे.
दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी ‘द कल्चर हॉटेल’, आळंदी (पुणे), महाराष्ट्र येथे आयोजित कार्यक्रमात तुषार खासबागे यांचा सन्मान करण्यात आला. ‘राष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ मिळाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय खासबागे, योगेश ठाकरे, प्रकाश गडवे, पत्रकार तथा नगरसेवक प्रविण सावरकर, पत्रकार निखिल बावणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तुषार खासबागे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111


No comments