adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हरित श्रीरामपूर उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना १२ हजार वृक्षाचे वाटप श्रीरामपूर नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम : आमदार हेमंत ओगले

हरित श्रीरामपूर उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना १२ हजार वृक्षाचे वाटप  श्रीरामपूर नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम : आमदार हेमंत ओगले  श्रीरामपूर...

हरित श्रीरामपूर उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना १२ हजार वृक्षाचे वाटप 

श्रीरामपूर नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम : आमदार हेमंत ओगले 




श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक : हेमकांत गायकवाड)


श्रीरामपूर नगरपरिषदेचा वृक्ष लागवडीचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. हजारो शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना रुजली जाईल असे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. नगराध्यक्ष करण ससाणे यांनी विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाची सांगता आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

       नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पुढाकार घेऊन नगरपरिषदे मार्फत श्रीरामपूर शहरातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या सुमारे बारा हजार शालेय विद्यार्थांना वृक्ष देण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांने वृक्ष लागवड करतानाच व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यामधील दोनशे विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

      यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, मी सर्वप्रथम आमदार हेमंत ओगले यांना धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून सुमारे बारा हजार वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध झाले. शहरातील शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व त्याचे महत्व समजण्यासाठी निश्चितच या उपक्रमाचां फायदा होणार असल्याचे म्हटले.

       यावेळी उपनगराध्यक्ष कांचन सानप, गटनेते मुजफ्फर शेख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, सभापती मंजुश्री मुरकुटे, दिपक वमने, योगेश जाधव, नगरसेवक वैशाली पोटे, कलीम कुरेशी, अशोक उपाध्ये, गोपाल लिंगायत, डॉ.दिलीप शिरसाठ, रितेश एडके, बिट्टू कक्कड, रियाज पठाण, आयाज तांबोळी, रज्जाक पठाण, सागर भागवत, सुधीर वायखिंडे, सुनील साबळे, अशोक जागधने, रितेश चव्हाणके, भाग्येश लोखंडे, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी यांच्यासह शालेय विद्यार्थ्यां व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments