adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणेश विसर्जन मार्गाची नगराध्यक्ष, पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी केली पाहणी अडथळे, वीजतारा, खड्डे व अरुंद रस्त्यांबाबत उपाययोजनांचा घेतला आढावा

गणेश विसर्जन मार्गाची नगराध्यक्ष, पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी केली पाहणी अडथळे, वीजतारा, खड्डे व अरुंद रस्त्यांबाबत उपाययोजनांचा घेतला...

गणेश विसर्जन मार्गाची नगराध्यक्ष, पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी केली पाहणी

अडथळे, वीजतारा, खड्डे व अरुंद रस्त्यांबाबत उपाययोजनांचा घेतला आढावा



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरातील गणेश विसर्जन मार्गाची नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील यांनी पाहणी केली. यावेळी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.

विसर्जन मार्गावरील विद्युत खांब, वीजतारा, लोखंडी तार तसेच रस्त्यावरील खड्डे आणि अरुंद ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मार्गातील अडथळे दूर करण्यासह आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी सौ नम्रता सचिन पाटील, पंकज बोरोले उपनगराध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, मुख्याधिकारी विवेक धांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पवन देसले, उपमुख्याधिकारी संजय मिसर दिगंबर वाघ नगर अभियंता, प्रमोद पाटील विद्युत अभियंता, महेश जोशी अतिक्रमण विभाग प्रमुख, महावितरणचे किशोर महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments