जे. ई. स्कूल आणि ज्यु. कॉलेज 'हरित सेने' अंतर्गत मुलानी केला १०० वृक्ष लागवड व संगोपनाचा संकल्प मुक्ताईनगर प्रतिनिधी सतिश गायकवाड (...
जे. ई. स्कूल आणि ज्यु. कॉलेज 'हरित सेने' अंतर्गत मुलानी केला १०० वृक्ष लागवड व संगोपनाचा संकल्प
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतिश गायकवाड
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सामाजिक वनीकरण विभागाच्या 'सेवा संकल्प अभियान' निमित्त आज येथील जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे हरित सेना अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे औचित्य साधून १०० वृक्ष लागवड व संगोपन संकल्प सोहळा उत्साहात पार पडला.या उपक्रमामुळे परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचा एक सकारात्मक संदेश पोचविणे हा उद्देश्य समोर ठेवून शालेय विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले, तसेच वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल व्ही. के. बोराडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. "केवळ वृक्ष लागवड न करता, त्याचे मुलासारखे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.या पर्यावरण पूरक उपक्रमात वनरक्षक राम असुरे, मयुर पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, एस. एम. वाढे आणि व्ही. डी. बऱ्हाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. ठाकूर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एस. बी. वंजारी यांनी मानले.


No comments