adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शनिवारी विज्ञान वारी साठी मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून नूतन मराठा महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड

शनिवारी विज्ञान वारी साठी मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून नूतन मराठा महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड जळगाव जिल्हा ...

शनिवारी विज्ञान वारी साठी मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून नूतन मराठा महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड


जळगाव जिल्हा प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून शनिवारी विज्ञान वारी हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमांतर्गत मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून दोन दिवस प्रशिक्षण दिले जाते सदर प्रशिक्षण नुकतेच 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट च्या दरम्यान चाळीसगाव येथील बीपी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चाळीसगाव येथे मराठी विज्ञान परिषद मुंबईचे श्री अभय यावलकर व  सौ जुईकर मॅडम यांच्याकडून देण्यात आले सदर प्रशिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांना विज्ञान पेटी देऊन विज्ञान प्रयोग कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते व सोबत विज्ञान प्रयोगाची पुस्तिका इंग्रजी व मराठी माध्यमातून दिली जाते व नंतर सदर प्रशिक्षण घेऊन सदर विद्यार्थी विद्यार्थिनी जळगाव शहरातील चार शाळांमध्ये जाऊन पाचवी ते आठवी या वर्गावरील विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोग दर शनिवारी सादर करून दाखवतात. सदर विद्यार्थी विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी .देशमुख, मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे चेअरमन श्री भालचंद्र पाटील साहेब, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव श्रीयुत डी.एस .भारंबे, सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर.बी .देशमुख यांनी विशेष अभिनंदन केले आहे. उप प्राचार्य डॉ. के बी पाटील यांनी अभिनंदन केले

No comments