adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील कला शिक्षक राजू साळींनी रंगीत खडू व कोळशा पासून साकारले श्रीकृष्ण जयंतीचे फलक लेखन

फैजपूर येथील कला शिक्षक राजू साळींनी रंगीत खडू व कोळशा पासून साकारले श्रीकृष्ण जयंतीचे फलक लेख न   इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी:-   (संपादक ...

फैजपूर येथील कला शिक्षक राजू साळींनी रंगीत खडू व कोळशा पासून साकारले श्रीकृष्ण जयंतीचे फलक लेखन 





 इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी:-
 
(संपादक :- हेमकांत गायकवाड)


अस म्हटलं जातं कला ही अमर आहे व तिला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक चित्रकार, मूर्तिकार अथवा कलाशिक्षक प्रयत्न करीत असतो.तसेच काही ना काही नवीन करण्याचा ध्यास मनी बाळगणारे  श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कला शिक्षक राजू साळी यांनी श्री कृष्ण जयंतीचे औचित्य साधून कला शिक्षक राजू साळी यांनी रंगीत खडू व कोळसा या माध्यमांचा प्रभावी वापर करून भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित आकर्षक व देखणे फलक लेखन साकारले आहे.

सदर फलक लेखनामध्ये भगवान श्रीकृष्णांचे लोभसवाणे रूप, त्यांच्या जीवनातील विविध पैलू तसेच त्यांनी दिलेला प्रेम, मैत्री, कर्तव्य, सत्य, नीती आणि मानवतेचा संदेश कलात्मक पद्धतीने मांडण्यात आला आहे. रंगीत खडूंच्या आकर्षक छटा आणि कोळशाच्या गडद रेषांचा सुंदर मिलाफ करून कला शिक्षक राजू साळी यांनी श्रीकृष्णांचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे साकारले आहे.

भगवान श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या जीवनातून प्रत्येकाने संकटांना धैर्याने सामोरे जावे, सत्य आणि कर्तव्याचा मार्ग स्वीकारावा तसेच समाजात प्रेम व बंधुभाव जपावा, असा संदेश मिळतो. श्रीमद्भगवद्गीतेतून श्रीकृष्णांनी दिलेला “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” हा कर्मयोगाचा संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त कला शिक्षक राजू साळी यांनी साकारलेल्या या अनोख्या फलक लेखनातून कला आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. रंगीत खडू व कोळसा या साध्या मात्र प्रभावी माध्यमातून साकारण्यात आलेल्या या कलाकृतीने विद्यार्थ्यांसह  शिक्षक आणि उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

या कलात्मक उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, श्रीकृष्णांचे विचार आणि कलात्मक अभिव्यक्ती यांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे कला शिक्षक राजू साळी यांनी सांगितले. तसेच शाळेचे  चेअरमन, सचिव, सभासद,मुख्याध्यापिका पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांनी साळींचे अभिनंदन व कौतुक केले.

No comments