वाचा फोडली वंचिताच्या व्यथा मिळावला पुरस्काराने शेख अजीज मोहम्मद यांच्या निर्भीड पत्रकारितेचा एमसीएन कडून गौरव पल्लवी पाटील खामगाव प्रत...
वाचा फोडली वंचिताच्या व्यथा मिळावला पुरस्काराने शेख अजीज मोहम्मद यांच्या निर्भीड पत्रकारितेचा एमसीएन कडून गौरव
पल्लवी पाटील खामगाव प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
एमसीएन न्यूजच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त खामगाव तालुका प्रतिनिधी शेख अजीज मोहम्मद यांना एमसीएन न्यूज उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या प्रभावी आणि निर्भीड वृत्तांकनातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शेख अजीज मोहम्मद यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शेख अजीज मोहम्मद यांनी खामगाव तालुक्यातील राजकीय घडामोडींसह सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब आणि वंचित घटकांच्या विविध समस्या आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या. केवळ बातमी प्रसिद्ध करण्यापुरते मर्यादित न राहता, संबंधित अधिकारी आणि प्रशासनाशी संपर्क साधून समस्यांवर चर्चा करून त्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
त्यांच्या वृत्तांकनामुळे अनेक नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून, संबंधित विभागांपर्यंत प्रश्न पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून, समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे प्रभावी साधन आहे, या भूमिकेतून शेख अजीज मोहम्मद यांची वाटचाल सुरू आहे.
त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत एमसीएन न्यूज परिवारातर्फे १३ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
या सन्मानाबद्दल शेख अजीज मोहम्मद यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील पत्रकारिता प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


No comments