सुवर्ण यशाची अभिमानास्पद गाथा: कु. अनन्या सराफ हिने उजळविले कुटुंबाचे नाव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन सुवर्णपदकांनी सन्मानि...
सुवर्ण यशाची अभिमानास्पद गाथा: कु. अनन्या सराफ हिने उजळविले कुटुंबाचे नाव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन सुवर्णपदकांनी सन्मानित
यावल प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील यावलकर कुटुंबाची नात व भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सराफ कुटुंबातील कन्या कु. अनन्या गिरीश सराफ हिने प्रतिष्ठित ‘महाराजा सयाजीराव विद्यापीठा च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात तिने अव्वल स्थान पटकावत दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली व तिचा सन्मान महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर कु. अनन्या गिरीश सराफ हिने असामान्य शैक्षणिक कर्तृत्व सिद्ध करत संपूर्ण कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली आहे. बडोदा येथील प्रतिष्ठित ‘महाराजा सयाजीराव विद्यापीठा च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात तिने अव्वल स्थान पटकावत दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे.कु. अनन्या ही वरणगाव ता. भुसावळ येथील रहिवासी सौ. स्मिता व श्री. गिरीश कमलाकर सराफ (हल्ली मुक्काम बडोदा) यांची सुकन्या, कै. कमलाकर सराफ (वरणगाव) व कै. डॉ. सतिश यावलकर (यावल) यांची नात तसेच पत्रकार तेजस सतिश यावलकर यांची भाची आहे.महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथील औषधनिर्माण तंत्रज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल विद्यापीठाच्या ७५ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते अनन्याला ही दोन्ही सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.या दैदिप्यमान यशामागे तिचे अथक परिश्रम, कुटुंबीयांचे संस्कार, प्रोत्साहन, भक्कम पाठबळ आणि गुरुजनांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे आई-वडील आणि धाकटी बहीण कु. आर्या यांच्यासह संपूर्ण सराफ व यावलकर परिवारावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments