विजय पंडित (कुंभार) यांची ‘कुंभार समाज सामाजिक संस्था’ यावल तालुकाध्यक्षपदी निवड भरत कोळी -यावल तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) ...
विजय पंडित (कुंभार) यांची ‘कुंभार समाज सामाजिक संस्था’ यावल तालुकाध्यक्षपदी निवड
भरत कोळी -यावल तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
‘कुंभार समाज सामाजिक संस्था, जळगाव’ च्या वतीने समाज संघटनेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. यावल येथील श्री. विजय देविदास पंडित (कुंभार) यांची कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या यावल तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे,उपाध्यक्ष सुभाष पंडित, आणि सचिव सखाराम मोरे यांच्या स्वाक्षरीने त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
विजय पंडित यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुंभार समाजातील विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
विजय पंडित हे नेहमी समाजातील विविध कार्यक्रमांचे नियोजन करीत असतात संत गोरा कुंभार जयंती कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे विविध कार्यक्रम ते राबवत असतात
यावल शहरातील सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते नेहमी अग्रेसर असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवा सेनेचे ते यावल शहराध्यक्ष सुद्धा आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे

No comments