चौघांची ती 'गुप्त डील' ठरली शेवटची! एलसीबीने रस्त्यातच गाडी घेरली अन,११ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक...
चौघांची ती 'गुप्त डील' ठरली शेवटची! एलसीबीने रस्त्यातच गाडी घेरली अन,११ लाखांचा मुद्देमाल केला जप्त..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- कांद्याच्या चाळीच्या आडून सुरू असलेल्या एका मोठ्या काळ्या कारभाराचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी ते समनापूर रस्त्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १,७०० किलो गोमांस वाहून नेणाऱ्या पिकअपसह चार तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.या धडक कारवाईत पिकअप आणि गोमांसासह एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईने अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदिप दरवडे आणि त्यांच्या पथकाने संगमनेर शहरात गोपनीय माहितीचे जाळे पसरवले होते.तपासादरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की,जमजम कॉलनीतील इसम अब्दुल हमीद कुरेशी आणि त्याचे साथीदार घराजवळील शेडमध्ये गोवंशाची कत्तल करून मोठ्या प्रमाणावर गोमांस विक्रीसाठी नेत आहेत. हे गोमांस एका पांढऱ्या रंगाच्या पिकअपमध्ये भरून सुकेवाडी ते समनापूर रस्त्यालगत असलेल्या असिफ शेख याच्या कांद्याच्या चाळीजवळ उभे असल्याची टीप पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच पथकाने पंचांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.संशयित पांढऱ्या पिकअपची झडती घेतली असता,पोलिसांना आतमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस भरलेले आढळून आले. पोलिसांनी कोणतीही संधी न देता जागीच अब्दुलहमीद अहमद कुरेशी (वय २३, रा. जमजम कॉलनी, संगमनेर)
कलामुद्दीन मिज्जन खान (वय २८, रा. हावडा ब्रीज, संगमनेर; मूळ रा. बहरीच, उत्तर प्रदेश)
अरबाज फिरोज खान (वाहन चालक, वय २४, रा. शिरूर, जि. पुणे) कैश शबनूर इनामदार (वय २३,रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर)या चारही संशयितांना ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५ लाख १० हजार रुपये किमतीचे १,७०० किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ६ लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप (क्र. MH-17-BD-4661) असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण सुधारित कायद्यानुसार गुन्हा (गु.र.नं. ८३९/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.संतोष मुटकुळे,पोउपनि.संदिप दरवडे,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,विजय ठोंबरे, संतोष खैरे,राहुल डोके,अमृत आढाव,योगेश कर्डीले आणि भगवान धुळे यांच्या पथकाने पार पाडली.

No comments