डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा दिनांक 05/09/202...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा दिनांक 05/09/2026 रोजी : चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
तसेच शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकवृंदांना शुभेच्छा देण्यात आल्या. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची दिशा देण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे,जिल्हा सचिव आरिफ शेख,दिलीप साळुंखे, देविदास पारधी, नगरसेवक रमाकांत ठाकूर,अमोल पाटील,छन्नू पाटील, प्रताप सोनवणे, सुमित पाटील,सुधाकर बाविस्कर आदी
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments