अंतुर्लीत श्रीकृष्ण लेझिम मंडळातर्फे दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न.... किरण धायले अंतुर्ली (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली, ता. मुक...
अंतुर्लीत श्रीकृष्ण लेझिम मंडळातर्फे दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न....
किरण धायले अंतुर्ली
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त बेलदार समाज सभागृह येथून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लहान मुले , युवा, गावातील जेस्ट नागरिकांनी, तसेच महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यानंतर बसस्थानक परिसरात बांधण्यात आलेली दहीहंडी गोविंदा पथकाच्या माध्यमातून फोडण्यात आली. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दहीहंडी पाहण्यासाठी अंतुर्ली व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण लेझिम मंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments